कोरोनाचा वाढता धोका विचारात घेवून आज पासून राज्यभरात संचार बंदी लागू होत असतानाच पंढरपुरात मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेतच सोशल डिस्टन्सींगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. कोरोनाचे सर्व नियम मोडून सभेला हजारोंची गर्दी झाली. या गर्दीतीतून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती देखील या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शहरातील शिवाजी चौकात सभा घेण्यात आली. या सभेला हजारो लोक उपस्थित होते. सभेत कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले.
गर्दीत अनेक लोक विनामास्क असल्याचेही दिसून आले. मैदानात क्षमते पेक्षा अधिक गर्दी झाल्याने कोरोना वाढण्याची शक्यता आहे.
#AjitPawar #Pandharpur #Coronaviurs #SocialDistance #Mask
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics